गुजरात राज्यात एक श्रणखला देवीचे मंदिर होते.मंदिर खुप भव्य असे होते.हजारो प्रवासी ,भक्त यात्रेकरू इथे दर्शनास येत असत. एकाएकी त्या मंदिरा चा मुख्य पुजारी मरण पावला.मंदिराच्या महणताला नवीन पुज्याऱ्याची जरुरी निर्माण झाली.त्यांनी घोषणा केली की, ‘ उद्या सकाळी पहिल्या प्रहरी येऊन पुजेसंबभित परीक्षेत जो योग्य ठरेल ,त्याला पुजारी म्हणून नेमले जाईल ‘.
मंदिर भव्य असे असल्यामुळे पुज्याऱ्याचे उत्पन्न बरेच होते.पुष्कळ ब्राह्मण सकाळी पोहोचण्यासाठी लवकर निघाले .मंदिर उंच डोंगरावर होते.येकाच रस्ता होता.त्याच्यावर काटे – कुटे ,दगड – धोंडे होते.ब्राह्मणाची गर्दी मंदिराकडे जात होती. काटे आणि दगड – धोंडे टाळत लोक कसेतरी चालले होते.
सर्व ब्राह्मण पोहचले .महंतने सर्वांना आदराने बसविले .सर्वांना देवाचा प्रसाद मिळाला.सर्वांना वेगवेगळे प्रश्नांनी मंत्र विचारले गेले.शेवटी परीक्षा पूर्ण झाली .दुपार झाली आणि सर्व लोक उठायला लागले,तेव्हा एक तरुण ब्राह्मण तेथे आला.त्याचे कपडे फटके होते.तो घामाने चिंब झाला होता.गरीब वाटत होता.
महंत म्हणाले, ‘ तुम्ही फार उशीर केला ‘.
ब्राह्मण म्हणाला , ‘ मला माहित आहे.मी फक्त देवाचे दर्शन घेऊन परत जाईन ‘.
त्याची दश्या पाहून महंताला दया आली .म्हणाले , ‘ तुम्ही लवकर का आला नाहीत? ‘.
त्याने उत्तर दिले , ‘ घरून लवकर निघालो .रस्त्यात बरेच काटे आणि दगड – धोंडे होते.यात्रेकरूंना चालण्यास त्रास होत असे.ते सर्व साफ करण्यात उशीर झाला ‘.
महंताने विचारले, ‘ बरे ,तुम्हाला पूजा येते का?’
ब्राह्मण म्हणाला , ‘ देवाला स्नान घालने,चंदन लावणे ,फुले वाहने,धूप – दीप दाखविणे ,नैवेद्य दाखविणे आणि पडदा पडणे ,शंख वाजविणे इतके मला येते ‘.
महंत म्हणाले , ‘ आणि मंत्र? ‘
तो उदास होऊन म्हणाला , ‘ देवाला आंघोळ घालण्यास ,खाऊ घालण्यास मंत्रसुधा असतात, है मला माहीत नाही ‘.
त्यावर ,सर्व पंडित हसू लागले .`हा मूर्ख सुद्धा पुजारी बनण्यास आला आहे ‘.
महंताने एक क्षण विचार केला आणि म्हणाला ,’ पुजारी तर तुम्ही बनालात .आता मंत्र शिकून घ्या .मी शिकवीन.मला देवाने स्वप्नात सांगितले की ,मला माणूस पाहिजे ‘.
‘ आम्ही लोक माणसे नाहीत का?’ दुसऱ्या पंडितांनी विचारले.ते लोक महंतावर नाराज झाले होते.इतके शिकले सावरलेले ब्राह्मण असताना हा महंत या मंत्रही न येणाऱ्यास पुजारी नेमतो,ही गोष्ट त्यांना अपमानकारक वाटत होती.
महंताने पांडीताकडे पाहिले आणि तो म्हणाला,’ आपला स्वार्थ तर पशूनाही समजतो.पुष्कळशी जनावरे फार चतुर असतात.पण खरा माणूस तोच की जो दुसऱ्यांना सुख देण्याकडे लक्ष ठेवतो.दुसऱ्यांना सुख देण्यासाठी आपला स्वार्थ आणि सुख देखील सोडून देतो ‘.
पंडित लोकांनी हे ऐकून खाली मान घातली .त्यांना फार लाज वाटली.ते हळूहळू उठले .देवाला व महंतला नमस्कार करून डोंगर पायथा उतरू लागले.
यावर ,आपण विचार करा की आपण माणूस आहात की नाही?